बाळासाहेब देसाई फौंडेशन
आपल्या पाटण तालुक्याच्या विकासास हातभार लागावा तसेच सर्वांगीण विकासासाठी फौंडेशनची स्थापना दिनांक १६जानेवारी १९८४साली फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांनी केली.
पाटण तालुका हा डोंगराळ व दुर्गम भागात विखुरलेला आहे .या भागाचे विकासासाठी व तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील मुलांना तांत्रिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्धेशाने सन १९८५ दौलत औद्धोगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना करणेत आली. सुरवातीला संस्थेत तीन व्यवसाय वर्ग सुरु करण्यात आले होते . त्यानंतर आजअखेर त्यामध्ये सात व्यवसाय व पाच तुकड्या कार्यान्वित आहेत. संस्थेत आज एकूण १४७ विद्यार्थी प्रवेशित असून प्रशिक्षण घेत आहेत. निकालाची परंपरा कायम ठेवण्यात या संसंस्थेने यश मिळविले आहे.आजअखेर तालुक्यातील हजारो तरुणांनी येते शिक्षण घेऊन नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करून आपल्या कुटुंबाचा चारिथार्त चालविला आहे काही तरुणांनी परदेशात नोकरी मिळवून संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे.
तसेच आपल्या आय टी आय मध्ये प्रवेश क्षमता मर्यादित असल्याने जास्तीजास्त प्रवेश देणे शक्य होत नसल्याने मा.नामदार साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून शासनाच्या कौशल्य विकास विभागा अंतर्गत सहा महिने कालावधीचे प्लंबर ,गांडूळखत,टू ऍण्ड थ्री व्हीलर मेकॅनिक व इलेक्ट्रिक वायंडर या कोर्सेस करीत शासन मान्य वर्ग चालू केले असून सध्या २१०विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.
श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स,कॉमर्स अँड आर्टस् सिनिअर कॉलेज दौलतनगर
तालुक्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय होण्याच्या दृष्टीने मा.नामदार श्री.शंभूराज देसाई साहेब यांनी फौंडेशन संचलित श्रीमती विजयादेवी देसाई सायन्स,कॉमर्स अँड आर्टस् सिनिअर कॉलेज दौलतनगर या महाविद्यालयाची ऑगस्ट २०१३ साली स्थापना केली प्रथमतः वाणिज्य व विज्ञान शाखा सुरु केली परंतु नंतर कला शाखेला विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून कला शाखा हि महाविद्यालयात सुरु करणेत आली चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्या ३९५ असून पुढील वर्षी कला शाखेच्या सर्व विषयांचे विभाग सुरु होणार आहेत.
महाविद्यालयात अनुभवी व उच्च पात्रता धारक शिक्षक वृंद, सुसज्ज प्रयोगशाळा,ग्रंथालय,डिजिटल क्लास रूम व सुसज्ज इमारत असून भविष्यात पारंपारिक विद्याशाखे बरोबरच इतर कोर्सेस सुरु करणेचे योजिले आहे. अल्प फ़ी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याचे काम संस्थेच्या महाविद्यालया मार्फत करणेत येत आहे.
सांस्कृतिक भवन
कारखाना संचलित बाळासाहेब देसाई फौंडेशन मार्फत कारखाना कार्यस्थाळावर शिवाजीराव देसाई सांस्कृतिक भवन या भव्य वास्तूची उभारणी केली आहे. सदरचे सांस्कृतिक भवनमुळे तालुक्यातील लोकांना सार्वजनिक समारंभासाठी जागेची सोया उपलब्ध झाली आहे.
देवालय
आपले कारखाना कार्यस्थाळावर अप्रतिम असे गणेश देवालय उभारले आहे. त्यामुळे गणेश भक्तांची दर्शनाची सोय झाली आहे. गणेश जयंती व संकष्टीचतुर्थी निमित्ताने येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच कारखाना कार्यस्थाळावर श्री नृसिंह मंदिराची उभारणी करणेत आली आहे
दरवर्षी फौंडेशनचे माध्यमातून भागातील लोंकांचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध संस्थाच्या मार्फत सर्वरोग निदान शिबीर ,रक्तदान शिबीर,दंतरोग शिबीर तसेच नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया या सारखे उपक्रम वेळोवेळी राबिवले जातात.